बाजार समिती उपसभापतिपदी धोटे
By Admin | Updated: June 15, 2016 01:58 IST2016-06-15T01:58:24+5:302016-06-15T01:58:24+5:30
जळगाव जामोद येथील कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापतीपदी धोटे यांची अविरोध निवड.

बाजार समिती उपसभापतिपदी धोटे
जळगाव जामोद: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी शांताराम धोटे यांची अविरोध निवड करण्यात आली. जुबेरोद्दीन पटेल यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
कृउबास समितीच्या विशेष साधारण सभेत शांताराम धोटे यांचा या पदासाठी एकमेव अर्ज असल्याने अध्यासी अधिकार्यांनी त्यांची निवड जाहीर केली. कृउबा समितीचे सभापती प्रसेनजित पाटील व संचालकांनी ठरविल्याप्रमाणे उपसभापतिपद हे तीन वर्षांंसाठी काँग्रेस सर्मथित संचालकांना तर दोन वर्षासाठी शिवसेना सर्मथित संचालकांना देण्यात येणार आहे. पहिले एक वर्ष काँग्रेस सर्मथित जुबेरोद्दीन पटेल यांना संधी मिळाली तर आता शिवसेना सर्मथित शांताराम धोटे हे उपसभापतिपदी विराजमान झालेत.
या विशेष साधारण सभेला सर्व संचालकांची उपस्थिती होती. याशिवाय सेनेचे नेते गजानन वाघ, न.प. उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, पं.स. उपसभापती विजय काळे, कृउबास सभापती प्रसेनजित पाटील, मावळते उपसभापती जुबेरोद्दीन पटेल, पवन चांडक, कैलास सोळंके, ईश्वर वाघ, आदींची यावेळी उपस्थिती होती. फटाके फोडून व पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त उपसभापती शांताराम धोटे यांचा शाल व श्रीफळ देऊन गजानन वाघ यांनी व इतर मान्यवरांनी याप्रसंगी सत्कार केला.