विवाहितेचा छळ; पतीस सहा महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:28 PM2021-01-10T12:28:03+5:302021-01-10T12:29:43+5:30

Buldhana Crime News जयश्री उर्फ रत्ना दिनेश सपकाळ (रा. रोहीणखेड) यांनी या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये तक्रार दिली होती.

Marital harassment; Husband get Six Monts imprisonment | विवाहितेचा छळ; पतीस सहा महिन्यांची शिक्षा

विवाहितेचा छळ; पतीस सहा महिन्यांची शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देसासूलाही न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे.मुल दिव्यांग असल्याने तिचा सासरची मंडळी छळ करत होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विवाहीतेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगाव खान्देश जिल्ह्यातील वरणगाव येथील एकास मोताळा न्यायालयाने सहा महिने शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सासूलाही न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. ९ जानेवारी रोजी न्यायालयाने हा निकाल दिला. 
    पीडित महिला जयश्री उर्फ रत्ना दिनेश सपकाळ (रा. रोहीणखेड) यांनी या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये तक्रार दिली होती. पती दिनेश सपकाळ, वच्छलाबाई सपकाळ, गजानन सपकाळ, चंद्रकांत सपकाळ (सर्व रा. वरणगाव जि. जळगाव) यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. पतीपासून महिलेस दोन अपत्यही झालेली होती; मात्र एक मुल दिव्यांग असल्याने तिचा सासरची मंडळी छळ करत होती. सोबतच माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या जयश्रीने पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी मोताळा न्यायालायत दोषारोपपत्र दाखल केले होते. मोताळा न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी पंकज देशपांडे यांच्या कोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी आले. या प्रकरणात वादी पक्षातर्फे तुषार उदयकार यांनी काम पाहले. प्रकरणात एकूण पाच जणांच्या साक्षी झाल्या. उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकूण आरोपी पती दिनेश उर्फ सोमनाथ सपकाळ यास शिक्षा सुनावली. 

Web Title: Marital harassment; Husband get Six Monts imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.