मराठी भाषिकांना मावशीची ओळख नाही
By Admin | Updated: September 14, 2014 00:38 IST2014-09-14T00:38:52+5:302014-09-14T00:38:52+5:30
प्राथमिक ज्ञान कमी : चित्रपट, प्रसारमाध्यमांचा जास्त प्रभाव

मराठी भाषिकांना मावशीची ओळख नाही
बुलडाणा : भाषा ही दोन संस्कृतींना एकत्र आणणारे माध्यम आहे. देशात विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्राची मा तृभाषा मराठी असली तरी अनेक ठिकाणी हिंदी भाषा बोलण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेला आई, तर हिंदी भाषेला मावशी म्हणून ओळखण्यात येते; मात्र मराठी व हिंदी भाषा बोलणार्या अनेकांना मावशीविषयी पूर्ण ओळख नसल्याचे दिसून येते. १४ सप्टेंबर रोजी हिंदी भाषा दिवसानिमित्त लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान नसल्याचे दिसून आले. याबाबत बुलडाणा शहर परिसरातील महाविद्यालयीन तरुणांना हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान किती आहे, याबाबत १0 प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात मराठी भाषिकांना हिंदी या मावशीची ओळख नसल्याचे दिसून आले.
* हिंदी दिवस १४ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो, हे फक्त ४२ टक्के तरुणांना माहीत होते. यावरून हिंदी बोलणार्या तरुणाईला हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान कमी असल्याचे दिसून आले.
* ५६ टक्के तरुणांनी मुन्शी प्रेमचंद हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक असल्याचे नमूद केले; मात्र १८ टक्के तरुणांनी आर.के. लक्ष्मण हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक असल्याचे नमूद केले.
* हिंदी भाषेतील म्हणी फार प्रसिद्ध असून, जवळपास ७0 टक्के तरुणांनी काला अक्षर..भैस बराबर नमूद करून हिंदी म्हणींचे चांगले ज्ञान असल्याचे सांगितले.
हिंदी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिल्या जाते ?
या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तब्बल ६४ टक्के युवकांनी देवनागरी हा पर्याय निवडला. १0 टक्के युवकांनी श्रीलिपी, तर १८ टक्के युवकांनी मोडीलिपी हा पर्याय निवडला.
हिंदीचा वापर दैनंदिन व्यवहारात लिखाणासाठी करता काय ?
मराठी मातृभाषा असली तरी हिंदीचा वापर अनेक ठिकाणी करण्यात येतो;मात्र दैनंदिन व्यवहारात हिंदी भाषेचा लिखाणासाठी वापर करता काय ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ४0 टक्के तरुणांनी नकार हा पर्याय निवडला. तर ३२ टक्के तरुणांनी कधी-कधी, तर १८ टक्के व्यक्तींनी ह्यहोयह्ण हा पर्याय निवडला. यावरून हिंदी भाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात कमी होत असल्याचे दिसून आले.
हिंदी भाषेतील पूर्णविराम कसा दिला जातो ?
हिंदी भाषेतील पूर्णविराम (.), ( !), (।) यापैकी कसा दिला जातो, याबाबत ५२ टक्के तरुणांनी चुकीचा (।) असा पर्याय निवडला. तर २८ टक्के तरुणांनी ( !) हा पर्याय निवडला. याशिवाय १२ टक्के तरुणांनी (.) हा पर्याय निवडला. यावरून हिंदी भाषेतील पूर्णविरामाबाबात तरुणांना पुरेसे ज्ञान नसल्याचे दिसून आले. अनेक तरुणांनी पूर्णविरामाबाबत माहिती नसल्याचे सांगून पर्याय निवडले नाहीत.