शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Protest: मलकापूरात आमदारांच्या घरासमोर ठिय्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:02 IST

मलकापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भूमिका विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले. 

ठळक मुद्देनंदनवन नगर स्थित आ. चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानी धडक देत निवासस्थानासमोर ठिय्या दिला. आमदार साहेब मुह खोलो - सभागृह मे कुछ तो बोलो अशा गगनभेदी घोषणा देत परीसर दणाणून सोडला. मान्यवर मंडळीनी समाजाची व्यथा व वेदना प्रकट करीत आरक्षण चा हक्क व गरज यावर भर दिला.

मलकापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भूमिका विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी  शासन अनुकुल असुन मी सुध्दा आरक्षणाच्या बाजूनेच आहे अशी भूमिकाचैनसुख संचेती यांनी मांडली.

मलकापूर व नांदुरा परिसरातील सकल  मराठा समाज बांधवांचे शहरातील छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालयात मोठया संख्येने एकत्रिकरण झाले.  या समाज बांधवांनी नंदनवन नगर स्थित आ. चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानी धडक देत निवासस्थानासमोर ठिय्या दिला. यावेळी समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय , आमदार साहेब मुह खोलो - सभागृह मे कुछ तो बोलो अशा गगनभेदी घोषणा देत परीसर दणाणून सोडला. दरम्यान समाजातील मान्यवर मंडळीनी समाजाची व्यथा व वेदना प्रकट करीत आरक्षण चा हक्क व गरज यावर भर दिला. यानंतर आ. संचेती यांनी आपली भूमिका मांडली. आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक आहे पण कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याकरिता कायदेशीर प्रकिया आमलात आणावी लागते. मागासवर्गीय आयोग गठीत केल्याशिवाय व आयोगाने सर्व समाजाचं मत लक्षात घेऊन आयोगाने सूचना केल्याशिवाय शासनाला कायदा स्वरूप चा निर्णय घेता येत नाही. या आयोगाचा अहवाल आॅक्टोंबर महिन्यापर्यंत येईल आणि आॅक्टोबर महिन्यानंतर अधिवेशनामध्ये निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळेल. याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत, अशी स्पष्ट ग्वाही आ. चैनसुख संचेती यांनी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMalkapurमलकापूरChainsukh Sanchetiचैनसुख संचेती