शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 15:20 IST

 मलकापूर: आरक्षणाच्या  मुद्यावर मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाची गोदावरी नदीत आरक्षणासाठी बलीदानाची माहती कळताच येथील समाजाने निर्धार केला.

ठळक मुद्देकाकासाहेब, तुमचं बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशा आशयाचा संकल्प शिवपुतळ्याच्या साक्षीत केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्थानबध्द होवून दिवंगत काकासाहेब शिंदे या तरूणाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

 मलकापूर: आरक्षणाच्या  मुद्यावर मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाची गोदावरी नदीत आरक्षणासाठी बलीदानाची माहती कळताच येथील समाजाने निर्धार केला. काकासाहेब, तुमचं बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशा आशयाचा संकल्प शिवपुतळ्याच्या साक्षीत केला. विदर्भाच्या प्रवेश द्वारी मलकापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्यावरूनअक्षरश: रान पेटविले. चिंब भिजून पावसात तहसील कार्यालयात चोख पोलीस बंदोबस्तात ठिय्या आंदोलन केले. त्यात सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी हजर होते. दुपारी आंदोलनकर्त्यांना काकासाहेब शिंदे या तरूणाने आरक्षणाच्या मुद्यावरून गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्याची माहिती कळली. त्यावर ठिय्या आंदोलन आटोपल्यावर मलकापूरात सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी नगरस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्थानबध्द होवून दिवंगत काकासाहेब शिंदे या तरूणाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी मनोगतातून प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. शेवटी काकासाहेब तुमचं बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा निर्धार मलकापूरातील सकल मराठा समाजबांधवांनी यावेळी केला. (तालुका प्रतिनिधी)

सकल मराठा समाजाची नांदुरा बंदची हाक नांदुरा: सकल  मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी संपुर्ण राज्यात विविध आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता नांदुरा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील महामार्गावरील मोठ्या हनूमान मुर्तीपासून शहरातील विविध रस्त्यांवर शेकडोच्या संख्येने मार्गक्रमण करीत शहर बंदची हाक देण्यात आली. यामुळे संपुर्ण नांदुरा शहरातील दुकाने बंद करण्यात आली.  नागरीकांनी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली. नांदुºयामध्ये ग्रामीण भागातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने दाखल झाला.  मंगळवारी दिवसभर संपुर्ण शहर बंद होते. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :MalkapurमलकापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद