मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:14 IST2017-08-07T03:22:41+5:302017-08-08T11:14:43+5:30

मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
लोणार: मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर शहरात ६ आॅगस्ट रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावपातळीवर प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले जात आहे. या पृष्ठभूमीवर
रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांच्या स्तरावर बैठकांचे नियोजन केले जात असून, तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी
मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज-बॅनर झळकल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार व प्रसार केला जात आहे. दरम्यान, मराठा समाजाच्यावतीने ६ आॅगस्ट रोजी बसस्थानक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला.