मेंदुज्वराने उपसरपंचाचा मृत्यू
By Admin | Updated: August 22, 2014 23:44 IST2014-08-22T23:44:01+5:302014-08-22T23:44:01+5:30
लाखनवाडा खुर्द येथील उपसरपंचाचे मेंदुज्वराने निधन.

मेंदुज्वराने उपसरपंचाचा मृत्यू
लाखनवाडा : लाखनवाडा खुर्द येथील उपसरपंच दिनकर ज्ञानदेव वानखडे (वय ४0) यांचे मेंदुज्वराने मृत्यू झाले. त्यांना सतत ताप येत होता. त्यामुळे गावात औषधोपचार केले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना खामगाव येथील खासगी रूग्णालयात भरती केले. परंतु त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि अखेर त्यांचे २१ ऑगस्ट रोजी औषधोपचारादरम्यान मृत्यू झाले.