ढालसावंगी येथे दारूचा महापुर
By Admin | Updated: April 11, 2017 20:45 IST2017-04-11T20:45:48+5:302017-04-11T20:45:48+5:30
ढालसावंगी- परिसरात गावठी दारूची विक्री जोमात सुरू आहे. पूर्णत: दारू बंदी करण्यासाठी गावातील महिलांनी सोमवारी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली.

ढालसावंगी येथे दारूचा महापुर
महिलांची पोलिस प्रशासनाकडे धाव
ढालसावंगी : येथील परिसरात अनेक ठिकाणी अवैध गावठी दारूची विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात येत असल्यामुळे दारू बंद करण्यासाठी ग्रामस्थ महिालांनी पोलिस प्रशासनाकडे १० एप्रिल रोजी धाव घेतली.
बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी येथे मागिल अनेक दिवसापासुन १३ ते १४ व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू पाडतात. दररोज गावात अंदाजे २०० ते २५० लिटर गावठी दारुची विक्री होत असुन या मुळे मोल मजुरी करून पैसे कमविणारे लोक घरात पैसे न देता नशा पाणी करून महिलांना त्रास देत आहेत. परिणाम घरातील लहान मुलानांही त्रास होत असून अनेक व्यक्ती घरातील भांडी, धान्य विकत आहेत. या परिसरात मागील २० ते २५ वर्षापासून दारु प्राशन केल्यामुळे आताप्रर्यंत ३० ते ३५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील अवैध गावठी दारूची विक्री कायम स्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी महिला ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे धाव घेवून पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी मुक्ताबाई नागरे, विमलताई नरवाडे इंद्राबाई लहाने, संगीताई शिंदे, लक्ष्मीबाई लहाने, लिलाबाई बेंडे, राधाबाई हिवाळे, गोधाबाई नरवाडे, रेखाताई गुळवे, आनंदीबाई पवार, रेखाताई गायकवाड, नंदाताई सोनुने, मनिषाताई भिंगारे, रेखाताई पाडळे, मिराताई खार्डे, साळुबाई शिंदे, पार्वतीबाई नरवाडे, शांताबाई मोरे, कस्तुराबाई हिवाळे, सुशीलाताई गवळी, सुमनबाई नरवाडे, शिवगंगाबाई वाघ आदी महिलांची उपस्थिती होती.