मलकापुरात चुरस वाढली
By Admin | Updated: October 16, 2014 00:30 IST2014-10-16T00:30:46+5:302014-10-16T00:30:46+5:30
सांयकाळी पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान; उमेदवारांचे भाग्य मशीनबंद.

मलकापुरात चुरस वाढली
मलकापूर (बुलडाणा): मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान घेण्यात आले. पुरूष १ लाख ३४ हजार १0६ व स्त्री १ लाख १८ हजार २८४ असे एकूण २ लाख ५२ हजार ३९0 मतदार होते. यापैकी सायंकाळी ५ वाजेपर्यंंंत पुरूष ७0 हजार ६९७ व स्त्री ६१ हजार १६२ अशा एकूण १ लाख ३३ हजार ८५९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये एकूण मतदारांची टक्केवारी ५२.७२ तर स्त्री मतदारांची टक्केवारी ही ५३.४0 टक्के म्हणजे एकूण ५३.0४ टक्के एवढी होती. मतदान प्रक्रियेची वेळ ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत असल्याने मतदानाची टक्केवारी ही वाढणार असून, ती ६0 ट क्केच्यावर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आज झालेल्या मतदानामध्ये दुपारी ३ वा. पर्यंत मतदानाचा उत्साह हा अत्यल्प राहिला हो ता. मतदानाची टक्केवारी ही केवळ ३७.२८ टक्केच होती. दुपारी ३ नंतर मतदारांनी म तदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. यामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५३.0४ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वा. पर्यंंंत मतदानाची वेळ असल्यामुळे हे मतदान वाढून ६0 टक्क्याच्यावर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आता निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांचे भाग्य हे ईव्हीएममध्ये सील झाले असून, यामध्ये कोणाचे नशीब चमकणार, हे बघण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
मलकापूर मतदारसंघ
एकूण मतदान २,५२,३९0
महिला १,१८,२८४
पुरुष १,३४,१0६
मतदान केंद्र २७३