शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : क्वारंटीन असलेल्या रुग्णांची हेळसांड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:06 IST

- हनुमान जगताप लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने क्वारंटीन करण्यात आलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचा ...

- हनुमान जगतापलोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने क्वारंटीन करण्यात आलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचा प्रकार रविवारी समोर आला. स्वच्छतेचा अभाव, पाण्याची व जेवणाची व्यवस्थीत सोय नसल्याचा आरोप त्यांनी केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशातच एक पॉझिटीव्ह रुग्ण मलकापूरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्या रुग्णाने खाजगी रूग्णालयातही उपचार घेतल्याचे उघड झाले त्यामुळे शहरात धास्ती निर्माण झाली. त्या धरतीवर शुक्रवारी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, डॉ. जी. ओ. जाधव, डॉ. चेतन जाधव देशमुख यांच्यासह तीन अशा सहा जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. व तपासणी अहवाल पाठविण्यात आले. परंतू क्वारंटीन रुग्णांसाठी सुविधांचा अभाव असल्याचा प्रकार समोर येत आहे.त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालय व बाथरूममध्ये पाणी नाही. साफसफाई नाही, बेडशीट बदलल्या जात नाही, जेवण अपुऱ्या प्रमाणात आणि तेही खाली टाकून कर्मचारी चालले जातात यासह अनेक गंभीर आरोप अ‍ॅड. हरीश रावळ, डॉ. जी.ओ. जाधव, डॉ. चेतन जाधव देशमुख यांच्यासह सध्या क्वारंटीन म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांनी केले आहेत. दरम्यान, क्वारंटीन असलेले सात रुग्ण पळून गेल्याचा दावा अ‍ॅड. हरीश रावळ यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल!सोशल मिडियावरही या रुग्णांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुर्लक्षीत कारभार समोर आला आहे. कोरोना बाबतीत केंद्र व राज्य शासन अतिशय संवेदनशील आहे. अशा परीस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना असुविधांचा सामना करावा लागतो.यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी मी सध्या आपल्याशी बोलू शकत नाही. असा संदेश मोबाईलवर पाठविला. मलकापूरातील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने या विषयी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे जाब विचारायचा कुणाला हा प्रश्न देखील अनुत्तरित राहतो. दुसरीकडे सोशल मिडियावर या प्रकाराची चर्चा असल्याने मलकापूर परीसरातील नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMalkapurमलकापूर