मलकापूर रेल्वेस्थानक व परिसराची तपासणी
By Admin | Updated: June 17, 2017 00:19 IST2017-06-17T00:19:12+5:302017-06-17T00:19:12+5:30
बॉम्बशोधक पथक, आरपीएफ, जीआरपी व विशेष खुपीया शाखेच्यावतीने मलकापूर रेल्वे स्थानक व परिसरात १६ जून रोजी तपासणी मोहिम राबवण्यिात आली.

मलकापूर रेल्वेस्थानक व परिसराची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : देशभरात दहशतवादी कारवाया वाढल्या असून त्या अनुषंगाने सजगता बाळगत सुरक्षिततेच्या दृष्टीने बॉम्बशोधक पथक, आरपीएफ, जीआरपी व विशेष खुपीया शाखेच्यावतीने मलकापूर रेल्वे स्थानक व परिसरात १६ जून रोजी तपासणी मोहिम राबवण्यिात आली.
सद्यस्थितीत संपूर्ण देशभरात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने सजगता बाळगत सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खुपीया शाखेचे विभागप्रमुख रंजन तेलंग, आरपीएफचे निरीक्षक बनकर, जीआरपीचे निरीक्षक परदेशी आदींनी संयुक्तरित्या बॉम्बशोधक पथक बुलडाणाच्या विशेष सहकार्याने रेल्वे स्टेशन परिसरात संशयीत वस्तुंची मेटल डिटेक्टर तसेच अन्य उपकरण घेवून तपासणी केली. ही कार्यवाही रेल्वे स्टेशन तथा परिसरात करण्यात आली.