शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:26 IST

मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्‍याचा शोध सुरू आहे.   आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ठळक मुद्देनवर्‍यावर उपचार, चुलत सासर्‍याचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्‍याचा शोध सुरू आहे.   आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील मौजे घिर्णी येथील रहिवासी रेखा हिचा विवाह मौजे दाताळा येथील योगेश दिगंबर तायडे याच्याशी झाला होता. पित्याकडून शेताच्या हिश्शाचे पैसे माग, असा तगादा लावून सासरची मंडळी मृतक रेखा योगेश तायडे हिला शारीरिक, मानसिक त्रास देत होते, असे पोलीस तक्रारीत नमूद आहे. रविवारी सकाळी ११ वाजता दाताळ्यातील भगवान गल्लीतील राहत्या घरी रेखा रक्ताच्या थारोळ्यात गावकर्‍यांना आढळून आली. गावकर्‍यांनी तिला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्याच दरम्यान मृत महिलेचा पती योगेश तायडेने विष प्राशन करून मलकापूर ग्रामीण पोलिसात सदर घटना कथन केली. पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आज सोमवारी तपास अधिकारी, पोलीस निरीक्षक विजय साळुंके यांनी मृत विवाहितेची सासू निर्मला दिगंबर तायडे, नणंद विजया जगन्नाथ शेगोकार अशा दोघींना अटक केली. चुलत सासरा प्रल्हाद तुळशीराम तायडे याचा शोध पोलीस घेत आहेत. विष प्राशनाने अत्यवस्थ चौथा आरोपी योगेश तायडेवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. आरोपी महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

टॅग्स :buldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेCrimeगुन्हाmalkapur bypassमलकापूर बायपास