शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात स्मार्ट कार्ड नोंदीत मलकापूर आगार आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:15 IST

मलकापूर आगारामध्ये ३ हजार ५२० जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एसटीच्या कॅशलेस प्रवासासाठी प्रवाशांना लागणाऱ्या स्मार्ट कार्डकरीता डेपोनिहाय नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. एका आगरांतर्गत दिवसाला जवळपास ५० नोंदी करण्यात येत आहेत. स्मार्ट कार्डसाठी जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यामध्ये जिल्ह्यात मलकापूर आगार आघाडीवर दिसून येत आहे.एसटी महामंडळाने आधुनिकतेकडे वाटचाल केली असून आता कॅशलेस व्यवहाराकडे एसटीचा प्रवास वळला आहे. एसटीचा प्रवास कॅशलेस करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या ७१ व्या वर्धापनदिनी केली होती. कॅशलेस व्यवहारासाठी अवश्यक असणाºया स्मार्ट कार्ड देण्याच्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागात सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात येणाºया बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद या सातही आगारांतर्गत स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. एका आगरामध्ये सरासरी ५० जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्याचे काम दिवसाला होत आहे.आतापर्यंत जिल्ह्यात स्मार्ट कार्डसाठ सर्वाधिक नोंदणी ही मलकापूर आगारामध्ये झाल्याची माहिती आहे. मलकापूर आगारामध्ये ३ हजार ५२० जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. तर दुसºयास्थानी बुलडाणा आगार असून येथे २ हजार ४७७ जेष्ठ नागरिकांनी नोंद केली आहे. चिखली आगारात १ हजार ४६१ जेष्ठ नागरिक, जळगाव जामोद येथील आरामध्ये १ हजार ७९६, खामगावमध्ये १ हजार ७१८, मेहकरमध्ये १ हजार १९ नोंदणी झाली आहे. सर्वात कमी नोंदणी शेगाव आगारामध्ये झाली आहे. शेगावमध्ये केवळ ६५२ जेष्ठ नागरिकांनी नोंद केली आहे. स्मार्ट कार्डसाठी झालेली ही नोंदणी केवळ जेष्ठ नागरिकांची असून विद्यार्थ्यांची नोंदणी वेगळी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीMalkapurमलकापूर