शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर शहर पोलिस निरिक्षकांची प्रकृती बिघडली; वरिष्ठ त्रास देत असल्याचा पत्नीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 23:04 IST

व्हीडीओ व्हायरल: वरिष्ठांच्या दबावामुळे प्रकृती बिघडल्याचा पत्नीचा आरोप

खामगाव : मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक प्रदीप ठाकूर यांना सोमवारी सांयकाळी हृदयविकाराचा झटका आला. सद्यस्थितीत त्यांच्यावर जळगाव खांदेश येथे उपचार सुरू असून, वरिष्ठांच्या दबावामुळे आपल्या पतीची तब्येत बिघडल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने एका व्हीडीओतून केला आहे. मात्र, त्याचवेळी या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेत. दरम्यान, या प्रकारामुळे  पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक प्रदीप ठाकूर यांची प्रकृती बिघडली. वरिष्ठांसमोर त्यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना तातडीने मलकापूर येथील डॉ. फिरके यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची ब्लड प्रेशर व इसीजी तपासणी करण्यात आली. दोनवेळा इसीजी काढण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळीच ठाकूर यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी असलेले अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीश बोबडे यांच्या दबावामुळे आपल्या पतीची प्रकृती खालावल्याचा आरोप ज्योती प्रदीप ठाकूर यांनी केला आहे. यासंदर्भात ज्योती ठाकूर यांचा बाईट असलेला व्हीडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला असून, या व्हीडीओमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ठाकूर यांची खामगाव येथील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. असे  वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

ठाकूर यांचे मलकापूर येथे काढण्यात आलेले दोन्ही इसीजी नॉर्मल आहेत. जळगाव येथेही त्यांचा इसीजी नॉर्मल निघाला असून, तज्ज्ञांनीच हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या पत्नीच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. केवळ वरिष्ठांवर दबाव आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

- गिरीश बोबडे

उपविभागीय पोलिस अधिकारी, मलकापूर

 

खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनचा पदभार असताना ठाकूर कामचुकार पणा करायचे. त्यामुळे आपल्या अहवालावरून त्यांना मुख्यालयी पाठविण्यात आले होते. त्यानंतर  कामकाज सुधारेल या उद्देशाने त्यांना मलकापूर येथे संधी देण्यात आली. मात्र, तिथेही त्यांची वर्तणुकीत सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे वरिष्ठांना यासंदर्भात अहवाल सादर केल्याने, हा प्रकार घडला.

- श्याम घुगे

 अप्पर पोलिस अधीक्षक, खामगाव.

टॅग्स :Policeपोलिसkhamgaonखामगाव