शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन कर्जमाफीचा मलिदा काँग्रेस-राकाँने लाटला - श्‍वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:39 IST

गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी केले.

ठळक मुद्दे तत्कालीन सरकारने केली होती फसवी कर्जमाफीया धामधुमीत बँकांनीसुद्धा आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने २00८ मध्ये फसवी कर्जमाफी करून शेतकर्‍यांची दिशाभूल केली होती. तेव्हाच्या कर्जमाफीचा मलिदा आघाडी सरकारच्या भागीदार असलेल्या दोन्ही काँग्रेसनी व त्यांच्या हितसंबंधीयांनीच लाटला. बँकांनीसुद्धा या धामधुमीत आपले उखळ पांढरे करून घेतले. तर तेव्हाच्या कर्जमाफीच्या लाभापासून गोरगरीब शेतकरी वंचित राहिला होता, या गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. पात्र शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा होणारच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी केले आहे.गत काही दिवसांपासून चिखली बाजार समितीचे संचालक मंडळ व जि.प. सभापती श्‍वेता महाले यांच्यात पत्रकयुद्ध सुरू आहे. या पृष्ठभूमीवर महाले यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, भाजपा सरकारने शेतकर्‍यांना दिलेला शब्द हमखास पूर्ण होणार आहे. कर्जाच्या खाईत पडलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी भाजपा सरकार वचनबद्ध आहे. प्रत्येक गरीब व पात्न शेतकर्‍याचा सात-बारा कोरा होऊन येत्या खरीप हंगामासाठी त्यांना पीक कर्ज मिळणारच आहे, तरी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडून शेतकरी बांधवांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु  नये, असे आवाहन केले आहे. याचबरोबर मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार करून छत्नपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- २0१७ सुरू केली. या योजनेद्वारे राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. त्याची अंमलबजावणी पारदर्शकपणे सुरू आहे. यासाठी सदर योजनेत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने शब्दच्छल करून काही शेतकर्‍यांना वगळले होते. त्यामध्ये कोरडवाहू शेतकर्‍यांचा भरणा मोठय़ा प्रमाणात होता. या शेतकर्‍यांनादेखील भाजपा सरकारने कर्जमाफीत सामावून घेत दिलासा दिला आहे. असे असताना तालुक्यातील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी कर्जमाफीविषयी जनतेमध्ये संभ्रम व गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करीत महाले यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार- प्रसार व जनतेपर्यंंत लाभ पोहचवणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते; परंतु त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याची टीकादेखील केली आहे. तर जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या खात्यात सुमारे ६0 कोटी रुपये कर्जमाफीच्या स्वरूपात जमा  झाले आहेत. येत्या काळात या रकमेत आणखी वाढ होईल, अशी माहितीदेखील महाले यांनी दिली असून, पुढील खरीप हंगामात शेतकर्‍यांना नव्याने पीक कर्ज मिळणार असल्याचा विश्‍वास महाले यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल