शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

अहमदनगर जिल्ह्यात शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 19:23 IST

अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांनी केलेले रास्तारोको आंदोलन चिरडुन काढण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्यावर अमानुष लाठीचार्ज करुन गोळीबार केला. या घटनेच्या निषेध करीत सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली

ठळक मुद्देस्वाभिमानी विद्यार्थी संघटनेची मागणीआंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी केला होता अमानुष लाठीचार्ज व गोळीबार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऊसाला एफआरपी किंवा ७०/३० च्या फॉर्मुल्यानुसार भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांनी केलेले रास्तारोको आंदोलन चिरडुन काढण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्या वर अमानुषपणे लाठीचार्ज करुन गोळीबार केला. या घटनेच्या निषेध करीत सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली.स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवनकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील गंगामाई व संत एकनाथ साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या ऊसाला एफआरपी किंवा ७०/३० च्या फॉर्मुल्यानुसार भाव द्यावा या मागणीसाठी शेवगांव तालुक्यातील खानापूर, गोटन येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यानी १४ नोव्हेंबर  रोजी शेवगांव ता. पैठण हा राज्यमहामार्ग अडवून आंदोलन केले. हे आंदोलन पोलीसांनी चिरडुन काढण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यावर १५ नोव्हेंबर च्या सकाळी लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील शेतकऱ्यानी पुन्हा एकत्र येवून आंदोलन सुरु केले. मात्र पोलीसांनी दुपारी पुन्हा आंदोलन कर्त्यांची धरपकड करुन शेतक-यांवर गोळीबार केला. यात भगवान मापारी व बाबुराव दुकाळे हे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. पोलीसांनी शेतक-यांच्या ऊसाच्या भावाचा प्रश्न सोडविण्या एवजी शेतक-यांवरच अमानुसपणे शेतक-यांवर गोळीबार करुन हे आंदोलन चिरडुन काढले. या घटनेचा स्वाभिमानी विद्यार्थी संघटना तिव्र शब्दात निषेध करुन झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी करुन दोषींविरुध्द कडक कारवाही करावी अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाध्यक्ष पवनकुमार देशमुख यांनी दिला. निवेदन देतांना स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष आकाश माळोदे, दत्तात्रय जेऊघाले, पंकज शेजोळे, पंकज उबरहंडे, राम अंभोरे, शिवा राऊत, चंद्रशेखर देशमुख, मयुर देशमुख, प्रतिक उबरहंडे हे उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन