सूर्याचे राशी संक्रमण पुढे सरकल्याने आज मकरसंक्रांत

By Admin | Updated: January 15, 2016 02:13 IST2016-01-15T02:13:23+5:302016-01-15T02:13:23+5:30

सूर्याचे राशी संक्रमण ७२ वर्षांनी एक दिवस पुढे सरकते.

Makar Sankranta today due to sun transplant transition | सूर्याचे राशी संक्रमण पुढे सरकल्याने आज मकरसंक्रांत

सूर्याचे राशी संक्रमण पुढे सरकल्याने आज मकरसंक्रांत

खामगाव: सूर्याभोवती पृथ्वी ३६५ दिवसात फिरते; परंतु आपणास सूर्य फिरत आहे असे दिसते. मकर राशीतून सूर्य भ्रमणास सुरुवात करतो. तो ३६५ दिवसांनी पुन्हा पहिल्या ठिकाणी येतो. या दिवसाला भोगी असे म्हणतात. कारण सूर्याने १२ राशी भोगलेल्या असतात. यावर्षी शके १९३७ (१५ जानेवारी २0१६) मध्ये गुरुवारी पौष शुद्ध पंचमीच्या दिवशी रात्री १.२५ मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला आहे त्यामुळे मकर संक्रांती शुक्रवार १५ जानेवारी रोजी येत आहे. सूर्य दररोज ३ मिनिटे, ५६ सेकंद उशिरा उगवतो. यामुळे ३६५ दिवसांत सूर्य उगवण्याची वेळ किंचित बदलते. दर ४ वर्षांनी हा फरक ३ मिनिट ५६ सेकंद एवढा होतो त्यामुळे ४ वर्षांनी लिप दिवस जास्तीचा येतो. या क्रमाने ७२ वर्षांनी १४४0 मिनिटे सूर्य आधी उगवतो. म्हणजेच सूर्य एक दिवस आधी उगवतो त्यामुळे सूर्याचे राशी संक्रमण ७२ वर्षांनी एक दिवस पुढे सरकते. या कारणाने १४ जानेवारीला येणारी मकरसंक्रांत १५ जानेवारीला येते. शिवाजी महाराजांच्या काळात ११ जानेवारीस मकरसंक्रांत येत होती. प्रत्येक ७२ वर्षांनी एक दिवसाचा फरक होत-होत ११ ऐवजी १२ पुढे १२ ऐवजी १३ त्यानंतर १३ ऐवजी १४ व आता १५ जानेवारीस मकरसंक्रांत आली आहे. यापुढे सन २0२९ सालापर्यंत दर दोन वर्षांनी मकरसंक्रांत १५ जानेवारीला व १४ जानेवारीला येणार आहे. तर २0२९ नंतर मकरसंक्रांत १५ जानेवारीला व त्यापुढील तारखेसच येणार आहे.

Web Title: Makar Sankranta today due to sun transplant transition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.