मका पिकास आग

By Admin | Updated: April 4, 2017 00:27 IST2017-04-04T00:27:02+5:302017-04-04T00:27:02+5:30

शेतातील सोंगणी केलेल्या मक्यास ३ एप्रिल रोजी रात्री अचानक आग लागून, या घटनेत साधारण ६० हजारांचे नुकसान झाले आहे.

Maize picas fire | मका पिकास आग

मका पिकास आग

धाड : बुलडाणा तालुक्यातील सावळी येथील एका शेतकऱ्याचे शेतातील सोंगणी केलेल्या मक्यास ३ एप्रिल रोजी रात्री अचानक आग लागून, या घटनेत साधारण ६० हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे.
सावळी येथील महिला शेतकरी निर्मलाबाई सुगदेव वाघ यांच्या गट नं. २८४ मधील ४८ आर क्षेत्रावर रब्बीची मका लागवड केली होती. त्या पिकाची सोंगणी करून पीक शेतात पडलेले होते. दरम्यान, ३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागून, ह्या घटनेत अंदाजे ४० आर शेतीपीक जळून खाक झाले आहे. याठिकाणी सदर शेतकऱ्याचे ६० हजारांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यास शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Maize picas fire