राहेरी बु परिसरात मका जमिनदाेस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:39 IST2021-02-20T05:39:51+5:302021-02-20T05:39:51+5:30
राहेरी, ताडशिवनी, केशवशिवनी, तढेगाव, दुसरबिड, हिवरखेड, किनगाव राजा, पांगरी उगले, जांभोरा, राहेरी खुर्द इत्यादी भागात वादळासह पावसाने ...

राहेरी बु परिसरात मका जमिनदाेस्त
राहेरी, ताडशिवनी, केशवशिवनी, तढेगाव, दुसरबिड, हिवरखेड, किनगाव राजा, पांगरी उगले, जांभोरा, राहेरी खुर्द इत्यादी भागात वादळासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. या परिसरात गव्हाचे पीक सोगणीला आले असून वादळी वाऱ्यासह पावसामुळे गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी धास्तवाला आहे. तसेच गव्हाबरोबर या भागात मका, हरभरा ,कांदा, शाळु ज्वारी ,भाजीपाला व काही ठिकाणी तर फळबाग चे सुध्दा नुसकान झालेले आहे. राहेरी बु येथे संध्याकाळी ६ च्या दरम्यान गट नंबर ३४२ मधील लक्ष्मीबाई दत्तात्रय देशमुख यांच्या शेतातील दोन एकर मका पीक पूर्णपणे भुईसपाट झालेले आहे. परिसरातील इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची हरभरा, गहु साेंगणीसाठी तारांबळ उडत आहे.
माझ्या चार एकरामध्ये मका हे पीक असून त्या मधील दोन एकरामधील मका पूर्णपणे भुईसपाट झाला आहे.त्यामुळे शासनाने मदत करण्याची गरज आहे.
दत्तात्रय देशमुख, शेतकरी राहेरी बु