मराठा आरक्षण कायम ठेवा
By Admin | Updated: November 15, 2014 23:59 IST2014-11-15T23:59:48+5:302014-11-15T23:59:48+5:30
खामगाव येथे मराठा संघटनांचा निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा.

मराठा आरक्षण कायम ठेवा
खामगाव(बुलडाणा) : न्यायालयाने आणलेली स्थगिती हटविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करून मराठा आरक्षण कायम ठेवावे, अन्यथा पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा विविध मराठा संघटनांनी आज उपविभागीय अधिकारी खामगाव यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात नमूद आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांंंच्या लढय़ानंतर नारायण राणे समितीच्या अहवालावरून महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घे तलेला आहे. परंतु मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात काही मराठा द्वेषी लोकांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी होत असताना राज्य सरकारने नेमलेले वकील आपली बाजू भक्कमपणे मांडू शकले नाहीत. राज्यातील सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी न्यायालयातील मराठा आरक्षणवरील स्थगिती उठविण्याकरिता यशस्वी प्रयत्न करून मराठा समाजाचे आरक्षण कायम करावे अन्यथा मराठा समाजाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.