Main roads in Khamgaon trap in encroachment! | खामगावातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात!
खामगावातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणाच्या विळख्यात दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येते. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून अपघाताच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र, अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिका स्तरावरून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते.
खामगाव शहरातील बसस्थानक चौक ते जलंब नाका आणि जलंब नाका ते गोसे महाविद्यालय आणि सुटाळा पर्यंत शहरातून जाणाºया मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू असतानाच या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण पोफावत आहे. नगर पालिकेसमोर आणि बसस्थानक चौकातील अतिक्रमण आणि किरकोळ विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. नांदुरा रोडवरील विविध व्यापारी संकुलासमोरील अस्ताव्यस्त पार्कींग देखील शहरातील एक मोठी समस्या आहे. अतिक्रमण निमुर्लनाकडे पालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष असून, खामगाव नगर पालिकेचे अतिक्रमण निमुर्लन पथक केवळ शहरातील फ्लेक्स आणि बोर्ड काढण्यापूरतेच मर्यादीत असल्याचे दिसून येते. अगदी नगर पालिका कार्यालयानजीक असलेल्या अतिक्रमण निर्मुलनासाठी देखील पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाकडून पुढाकार घेण्यात नाही. त्यामुळे अतिक्रमण निमुर्लन पथकाचा उपयोग तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

 
वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका!
रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान नांदुरा रोडची एक बाजू वाहतुकीसाठी सुरू आहे. त्यामुळे आधीच रहदारीस अडथळा निर्माण होत असताना, एका बाजूने तयार होणाºया सिमेंट रस्त्यांवर नांदुरा रोडवरील व्यापारी संकुलासमोर मोठ्याप्रमाणात दुचाकी पार्क केल्या जातात. नगर पालिकेच्या व्यापारी गाळ्यांसोबतच खासगी व्यापारी गाळ्यासमोरही हीच परिस्थिती कायम आहे. बसस्थानक चौक आणि रेल्वे स्थानकसमोर पार्कींगमुळे दररोज वर्दळीच्यावेळी वाहतूक कोंडी होते. ही समस्या नित्याचीच झाली असतानाही वाहतूक पोलिसांकडून केवळ बघ्यांची भूमिका घेतल्या जात असल्याचे चित्र आहे.

 

Web Title: Main roads in Khamgaon trap in encroachment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.