शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील गुटखा जप्ती कारवाईत सुत्रधार मोकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:19 IST

अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगावातील एमआयडीसीत जप्त करण्यात आलेल्या प्रंतिबंधित गुटखा प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी सुत्रधाराला सोडून मजूरावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाई विरोधात जिल्हाप्रशासनासोबतच न्यायालयात नाराजी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादन यावर अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांच्या १५ जुलै २०१४ च्या अधिसुचनेद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देशातही तंबाखू मिश्रीत गुटखा विक्रीस बंदी आहे. मात्र, अशाही परिस्थितीत चोरट्या मार्गाने शहरात गुटख्याची विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादनही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. दरम्यान, ७ आॅगस्ट रोजी खामगाव येथील एमआयडीसीतील एका गोदामात चक्क ३४ लक्ष रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका मजुरावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई चुकीच्या पध्दतीने झाल्याने, याप्रकरणी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात नाराजी याचिका दाखल करण्यात आली आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात ‘नाराजी पिटीशन’!खामगाव एमआयडीसीत ७ आॅगस्ट रोजी शासनाने प्रतिबंध केलेला आणि मानवी आरोग्यास घातक असलेला ४६ पोते आणि १८ कट्ट्यांमध्ये असलेला ३४ लक्ष रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये राजू श्याम गव्हांदे रा. शंकर नगर खामगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राजू गव्हांदे यास जामीन नाकारण्यात यावा, तसेच मुख्य सुत्रधाराला आरोपी करण्यात यावे यासाठी खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात जामीन नाकारण्याचा अर्ज (नाराजी पिटीशन) अ‍ॅड. एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्यामार्फत दाखल करण्यात आले. या अर्जावर १९ आॅगस्ट रोजी सुनावनी होणार आहे.

खामगाव येथील एमआयडीसीतील एका गोदामात जप्त करण्यात आलेल्या गुटखा साठ्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस प्रशासनाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई केली.-प्रदीप पाटीलएसडीपीओ, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस