२४ ग्रामपंचायतींमध्ये ‘महिला राज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 02:18 IST2015-09-02T02:18:49+5:302015-09-02T02:18:49+5:30
खामगाव तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत पैकी २४ गावांची धूरा महिलांकडे आली आहे.

२४ ग्रामपंचायतींमध्ये ‘महिला राज’
खामगाव : तालुक्यात ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली असून, ३३ ग्रामपंचायत पैकी २४ गावात महिलांचे राज आले आहे. यामुळे गावाची धुरा आता महिला सांभाळणार आहे. तालुक्यातील पिंप्री देशमुख, वाडी, चिंचपूर, हिवरा खुर्द, राहुड, गवंढाळा, सुटाळा बु., टेंभुर्णा, लाखनवाडा बु., ज्ञानगंगापूर, भंडारी, शहापूर, गोंधनापूर, सिरजगाव देशमुख, गारडगाव, घाटपुरी, कारेगाव बु., कोलोरी, शिर्ला नेमाने, मांडका, पाळा, कुंबेफळ, गणेशपूर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.