महावितरणच्या कर्मचार्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:52 IST2017-09-26T00:52:31+5:302017-09-26T00:52:31+5:30
बुलडाणा: बुलडाणा-चिखली रस्त्यावरील महावितरण कं पनीच्या कार्यालयातील एका कर्मचार्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

महावितरणच्या कर्मचार्यास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बुलडाणा-चिखली रस्त्यावरील महावितरण कं पनीच्या कार्यालयातील एका कर्मचार्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
याबाबत महावितरणचे सहायक अभियंत्यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, चिखली रस्त्यावरील महावितरण कं पनीच्या कार्यालयात शिकाऊ कर्मचारी दत्ता तुळशीराम खोरे रा. माळवंडी यास जुन्या गावातील दारू पिलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच टेबलावरील तक्रार नोंदीचे रजिस्टर फेकून दिले व कागदपत्रे अस्ताव्यस्त केली.
याबाबत अधिक चौकशी केली असता अज्ञात आरोपीपैकी एकाचे नाव सुरेंद्र दसरकर असल्याचे समजते.
या घटनेमुळे कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार सुनील जाधव करीत आहेत.