शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Vidhan Sabha 2019: मातृतीर्थात राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 14:13 IST

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे.

- सोहम घाडगेबुलडाणा - जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सलग चार वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गतवेळची निवडणूक त्यांनी लढवली नाही. मात्र आगामी विधानसभेच्यादृष्टीने त्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी भूमीपूजनाचा धडाका लावला आहे. पाच वर्षांत विकासकामे केल्याचे सांगत त्यांनी दौरे सुरू केले आहे.त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.माँ जिजाऊंचे जन्मस्थळ आणि विदर्भ - मराठवाड्याच्या सीमा जोडलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाकडे यंदा जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या आहेत. या मतदारसंघात ३ लाख ११ हजार २६६ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ६३ हजार १०४ पुरुष तर १ लाख ४८ हजार १६५ स्त्री मतदार आहेत. लोकसभेनंतर विधानसभेसाठी १ हजार ५३५ मतदार वाढले आहेत. वाढलेले नवीन मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान गेली निवडणूक न लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीचे आघाडीचे गणित जमल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र युती संदर्भात भाजप, सेनेचे अजून तळयात मळ्यात असल्याने समीकरणे बदलू शकतात. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षात नेते, कार्यकर्त्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग सुरु आहे.राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांनी मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसमधील एका बड्या नेत्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. राजकीय भवितव्य व आपली जागा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी आणखी उलथापालथ या मतदारसंघात बघायला मिळणार आहे.सध्यातरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरही टीकास्त्र सोडले जात आहेत. आपल्या नेत्याची प्रतिमा कशी चांगली व दुस-याची कशी वाईट हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांची भूमिका शिवसेनेच्या बाजूने दिसून येत आहे. मात्र ऐनवेळी युतीचे गणित फिस्कटले तर भाजपच्या उमेदवारीसाठीही तगडी स्पर्धा बघायला मिळेल. तुर्त भाजपच्या गोटात शांतता असली तरी स्वबळाची चाचपणी भाजपने आधीच केली आहे. वंचितकडूनही येथे काही नावे सध्या चर्चेत येत असून प्रत्यक्षात येथे वंचितची उमेदवारी कोणाच्या गळ््यात पडते, यावरही अनेक गणिते अवलंबून आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसbuldhanaबुलडाणाsindkhed-raja-acसिंधखेड राजा