शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:41 IST

ज्यातील दहा जिल्ह्यातील जमीनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे आतापर्यंत भूसंपादन झाले असून उर्वरित जमीन ही आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तीचे अवॉर्ड काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी एकूण सात हजार २९० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे.त्यापैकी जवळपास ८३ टक्के जमीन जून अखेर पर्यंत सरळ खरेदीद्वारे मुल्यांकनाच्या पाचपट मोबदला देऊन घेण्यात आली होती.

- नीलेश जोशी

बुलडाणा : विदर्भ, मराठवाड्यास थेट मुंबईला जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी म्हणून गणल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या राज्यातील दहा जिल्ह्यातील जमीनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे आतापर्यंत भूसंपादन झाले असून उर्वरित जमीन ही आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तीचे अवॉर्ड काढण्यात येणार आहे. तशी अधिसुचनाही तीन आॅगस्ट रोजी काढण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी एकूण सात हजार २९० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे. त्यापैकी जवळपास ८३ टक्के जमीन जून अखेर पर्यंत सरळ खरेदीद्वारे मुल्यांकनाच्या पाचपट मोबदला देऊन घेण्यात आली होती. विशेष म्हणजे या सरळ खरेदीमध्ये बुलडाणा जिल्हा हा त्यावेळी राज्यात अव्वल ठरला होता. दरम्यान, उर्वरित १२३३ हेक्टरपैकी बुलडाणा जिल्ह्यातील १२७ हेक्टर जमीन अद्याप खरेदी करणे बाकी आहे. मात्र आता ही जमीन थेट महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तिचे अवॉर्ड करण्यात येणार आहे. प्रामुख्याने जी जमीन खरेदी करण्याचे राहलेली आहे ती न्यायप्रविष्ठ प्रकरणे, वारसा हक्काचे आपसी वाद व तत्सम कारणांनी राहलेली आहे. त्यामुळे अशा प्रकरणात बाजार मुल्याच्या चार पटच मोबदला देण्यात येणार असून तो प्रसंगी न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये थेट न्यायालयात जमा करण्यात येईल, असे सुत्रांनी स्पष्ट केले. या उपरही आपसी वाद सामंजस्याने मिटवून जमीनीचे संमतीपत्र दिल्यास त्या प्रकरणात बाजार मुल्याच्या पाच पट मोबदला देण्याची शासनाची भूमिका असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात आली असून त्यापोटी ६५० कोटी रुपयांचा मोबदला आतापर्यंत संबंधीत शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. समृद्धी महामार्गासंदर्भात गेल्या आठवड्यात मुंबईत अनुषंगीक बैठकही घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.

प्रकरणे एसडीओकडे वर्ग

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम लागू झाल्याने आता भूसंपादनाच्या १८(१) च्या नोटीस बजावणे तथा संबंधित प्रकरणामध्ये अवॉर्ड जाहीर करण्यची प्रक्रिया ही उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर होणार आहे. त्यानुषंगाने समृद्धी महामार्गासंदर्भातील प्रकरणे ही मेहकर आणि सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. अवॉर्ड करणे कलम १८ (१) च्या नोटीस बजावण्याची कामे तेथूनच होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग