चिखलीत महाराणा प्रताप भवन उभारणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:45+5:302021-02-05T08:31:45+5:30
गेल्या दोन वर्षांपुर्वी चिखली येथे वसंतराव गाडेकर गुरुजी यांनी राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजपूत ...

चिखलीत महाराणा प्रताप भवन उभारणार !
गेल्या दोन वर्षांपुर्वी चिखली येथे वसंतराव गाडेकर गुरुजी यांनी राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजपूत समाज महामेळाव्याचे आयोजन केले होते. त्या महामेळाव्यात महाराणा प्रताप भवन उभारण्यासाठी चिखली शहरात नगर परिषद हद्दीतील भूखंड देण्याबाबतची मागणी पुढे आली असता स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे यांना सूचित केल्याने भाजपा नेते कुणाल बोंद्रे यांनी याच सभेत भूखंड देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्ष कृती करून शहरात २० हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड उपलब्ध करून दिला. या पृष्ठभूमीवर वीर महाराणा अर्बनच्या सभागृहात आ. श्वेता महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत भवनाच्या निर्मितीबाबत बैठक पार पडली. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष तथा अ.भा.क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव गाडेकर यांनी भवन निर्मितीबाबतचा आढावा घेऊन भवनाच्या विकास कामासाठी स्वत: एक लाख रुपयाची देणगी जाहीर केली. अध्यक्षस्थानी डॉ.प्रतापसिंह परिहार होते. प्रमुख उपस्थितीत डॉ.प्रतापसिंह राजपूत, डॉ.ए.एस.वसू, अशोकराव सुरडकर, सुभाषसिंह राजपूत, बद्रीनाथ महाले होते. यावेळी डॉ.पंढरी इंगळे, डॉ.उदय इंगळे, पुरुषोत्तम सुरडकर, प्राचार्य निवृत्ती तवर, पंढरी इंगळे, राजेंद्र भुतेकर, सुनील सुरडकर, पप्पु राजपूत, आत्माराम इंगळे, शिवदास सोळंकी, श्रीकिसन परिहार, सागर परिहार, जगन्नाथ वाघ आदी समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन यु.टी. परिहार यांनी तर आभार विठोबा इंगळे यांनी मानले.
भवनाच्या निर्मितीसाठी कटिबध्द : आ.महाले
भवनाच्या निर्मितीबाबत स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या आदेशाचे पालन करीत नगर परिषदेकडून कायदेशीर दृष्टीने सर्व बाबींची पूर्तता झाली. भूखंड देण्याबाबतचा ठराव न.प.स्तरावर घेण्यात आला आहे. सद्यपरिस्थितीत शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्यामुळे बांधकाम रखडले आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून चिखली शहरात लवकरात लवकर भव्यदिव्य महाराणा भवन उभारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आ. श्वेता महाले यांनी दिली.