शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश पोलीस-आरोपींमध्ये चकमक

By admin | Updated: April 25, 2017 00:35 IST

संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथे गोळीबार

सोनाळा : संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी या आदिवासीबहुल खेड्यात मध्य प्रदेश पोलीस आणि देशी कट्ट्याच्या सूत्रधारामध्ये चकमक घडली. ही घटना निमखेडी येथील गुरुद्वारा परिसरात सकाळी ११ वाजता घडली असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.संग्रामपूर तालुक्याच्या सीमा रेषेवर पाचोरी नामक देशी कट्टा बनवण्याचे माहेरघर असल्याचे सर्वश्रुत आहे. पाचोरी हे गाव मध्य प्रदेशात असल्याची नोंद आहे. याठिकाणी वास्तव्यात असलेला त्रिलोकसिंग सुलतानसिंग हा देशी कट्टा बनवणारा मुख्य सूत्रधार आहे. याने बनवलेले देशी कट्टे दिल्ली, नांदेड, खंडवा, नागपूर याठिकाणी मागील काळात पोलिसांनी पकडले होते. पोलिसांना हा मुख्य सूत्रधार सापडला नाही. मध्य प्रदेश खंडवा येथे पाचोरी येथील देशी कट्टा मागील आठवड्यात मध्य प्रदेश पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर पकडला होता. त्यामध्ये मुख्य चार आरोपी पकडण्यात आले. त्यांनी यातील मुख्य सूत्रधार पाचोरी येथे राहतो, असे सांगून मध्य प्रदेश पोलीस इन्चार्ज पी.आर. डाबर (खंडवा) यांनी २० लोकांची कुमक बनवून पाचोरी मार्गे अंबाबरवा ता. संग्रामपूर जि.बुलडाणा बंदर तलाव येथे आले. चार आरोपी व मध्य प्रदेश पोलीस अंबाबरवा अभयारण्यातील बंदर तलाव येथे मुख्य सूत्रधार त्रिलोकसिंगच्या मागावर होते.निमखेडी (ता.संग्रामपूर) येथे तारासिंग चव्हाण यांचा तेरवीचा कार्यक्रम होता. येथील सिख समाजाच्या गुरुव्दारा येथे पठण चालू होते. गुरुद्वारासमोर आरोपी त्रिलोकसिंग व मध्य प्रदेश पोलीस येऊन त्यांच्यात गोळीबाराची चकमक झाली. या चकमकीत गोळी चरणसिंग चव्हाण यांच्या घराच्या दरवाजाला लागली. या चकमकीत गावातील कोणालाही दुखापत झाली नाही. ही चकमक निमखेडी येथील गुरुद्वारा मंदिराजवळ १० मिनिट चालू होती. यामध्ये मुख्य सूत्रधार फरार होण्यात यशस्वी झाला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखलया घटनेची माहिती सोनाळा पोलिसांना मिळताच ठाणेदार सचिनसिंह परदेशी घटनास्थळी दाखल झाले होते. फरार आरोपी त्रिलोकसिंग सुलतानसिंग याचेविरुद्ध कलम ३५३, आर्म अ‍ॅक्ट २८ नुसार गुन्हा दाखल करून एक काडतूस ताब्यात घेतले. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत साळुंके यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला भेट देत घटनेबाबत माहिती जाणून घेतली.