माधुरी देशमुख मोताळ्याच्या नगराध्यक्ष

By Admin | Updated: November 27, 2015 01:43 IST2015-11-27T01:43:57+5:302015-11-27T01:43:57+5:30

उपाध्यक्षपदी शे.सलीम शे. बशीर.

Madhuri Deshmukh, President of Motala | माधुरी देशमुख मोताळ्याच्या नगराध्यक्ष

माधुरी देशमुख मोताळ्याच्या नगराध्यक्ष

मोताळा : ग्रामपंचायतीनंतर प्रथमच अस्तित्वात आलेल्या मोताळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी पुरूषोत्तम देशमुख यांची, तर उपनगराध्यक्षपदी शे. सलीम शे. बशीर यांची निवड करण्यात आली. नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे १७ पैकी ८ नगरसेवक निवडून आले होते व नंतर लगेच निवडून आलेल्या तीन अपक्षांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांचे संख्याबळ ११ झाले होते. मंगळवारी नगराध्यक्षपदाची निवडणूक शांततेत पार पडली असून, काँग्रेसकडे संख्याबळ अधिक असल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष (दोन्ही काँग्रेस) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मोताळा नगरपंचायतीवर आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच काँग्रेसचा झेंडा फडकला. तहसील कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी नगराध्यक्षपदाची निवडणूक कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे काँग्रेसच्या माधुरी पुरूषोत्तम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे भाजपकडून बयनाबाई ङ्म्रीकृष्ण पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज परत घेतल्यामुळे माधुरी पुरूषोत्तम देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. नंतर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून एक व सेनेकडून एक असे दोन अर्ज भरण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे शे. सलीम शे. बशीर व सेनेचे विजय आनंदा सुरळकर यांचा समावेश होता. यापैकी विजय आनंदा सुरळकर (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे उपाध्यक्षपदी काँगेसचे शे. सलीम शे. बशीर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एस. एम. चव्हाण व विशेष कार्यकारी अधिकारी ङ्म्रीपाद देशपांडे यांनी काम पाहिले. निवडीनंतर शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात अली. दरम्यान, बोराखेडीचे ठाणेदार दीपक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Madhuri Deshmukh, President of Motala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.