माँ जिजाऊ व विवेकानंद हे मानव कल्याणाचे प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:15+5:302021-01-14T04:28:15+5:30
मेहकर : माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, अशी शिकवण दिली. त्यामुळे हे दोन्ही ...

माँ जिजाऊ व विवेकानंद हे मानव कल्याणाचे प्रेरक
मेहकर : माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, अशी शिकवण दिली. त्यामुळे हे दोन्ही महापुरुष मानव कल्याणाचे प्रेरक होते, असे विचार मेहकरचे दुय्यम निबंधक सुरेश वाकुडे यांनी व्यक्त केले.
१२ जानेवारी रोजी स्थानिक मुद्रांक व नोंदणी कार्यालयात आयोजित जिजाऊ जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी कृषी अधिकारी अंकुश खाडे यांनी प्रास्ताविक केले. दुय्यम निबंधक वाकुडे व इतर मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संगणक परिचालक एजाजभाई देशमुख, अर्जुन तुपे, शिसोदे, अमोल शिंदे, दीपक बाजड, सागर कानोडजे, विजय शेजूळ हे उपस्थित होते. यावेळी मुद्रांक व नोंदणी कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.