प्रियकराच्या संगनमताने पती व मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 17, 2015 01:18 IST2015-02-17T01:18:05+5:302015-02-17T01:18:05+5:30

मेहकर तालुक्यातील घटना.

A lover's wife tried to kill her husband and children | प्रियकराच्या संगनमताने पती व मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न

प्रियकराच्या संगनमताने पती व मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न

जानेफळ (मेहकर, जि. बुलडाणा) : तालुक्यातील मुंदेफळ येथे एका विवाहितेने प्रियकराच्या संगनमताने पती व मुलांना जेवणात विषारी औषध टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी विवाहित महिलेसह प्रियकराविरुद्ध गुरुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंदेफळ येथील लता चांदणे हिचे गावातीलच रमेश पूनमचंद होणे याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे तिने प्रियकराच्या संगनमताने २१ जानेवारी रोजी पती, ८ वर्षीय मुलगा व अडीच वर्षीय मुलगी यांना जेवणातून विषारी औषध देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात पती सुरेश वायाजी चांदणे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी लता सुरेश चांदणे व रमेश पूनमचंद होणे यांच्याविरुद्ध कलम ३२८, ५११, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A lover's wife tried to kill her husband and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.