लोटाबहाद्दरांकडून १६ हजारांचा दंड वसूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:07 IST2017-08-12T01:06:02+5:302017-08-12T01:07:51+5:30

खामगाव:   उघड्यावरील हगणदरीला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ३२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

LotaBahadder collects fine of 16 thousand! | लोटाबहाद्दरांकडून १६ हजारांचा दंड वसूल!

लोटाबहाद्दरांकडून १६ हजारांचा दंड वसूल!

ठळक मुद्देनागरिकांमध्ये धास्तीखामगाव नगरपालिकेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:   उघड्यावरील हगणदरीला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ३२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. दरम्यान, शहरातील १३ पैकी दहा ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यात आल्यानंतर, उर्वरित तीन ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नोटिस दिल्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न देणार्‍या लोटाबहाद्दरांवर पालिका प्रशासनाच्यावतीने विविध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्या. या कारवाईलाही न जुमानता उघड्यावर शौचास करणार्‍या लोटाबहाद्दरांवर आता पालिकेने दंडात्मक कारवाईस प्रारंभ केला आहे. गुरुवारी १४ जणांवर कारवाई करण्यात आल्यानंतर शुक्रवारी पुन्हा १८ जणांवर नगरपालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाने कारवाई केली आहे. पाणीपुरवठा अभियंता तथा आरोग्य पर्यवेक्षक नीरज नाफडे,  आरोग्य निरीक्षक अनंत निळे, सुनील राजपूत, महेंद्र महितकर, मोहन अहीर, सुभाष शेळके यांनी ही कारवाई केली.

ग्रामीण गुड माँर्निंग पथकाची २३ जणांवर कारवाई
खामगाव: पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी २३ जणांवर कारवाई केली. २३ नागरिकांना हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. हिवरखेड, नायदेवी, घारोड, लोखंडा  या गावांमध्ये तालुका ग्रामसेवक  बगळे, निमाडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

शौचालय बांधकामासाठी अनुदान दिल्यानंतरही काही नागरिक उघड्यावर शौचास येत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुसर्‍यांदा उघड्यावर आल्याचे निदर्शनास येताच १,२00 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल.    
- नीरज नाफडे, अभियंता तथा आरोग्य पर्यवेक्षक, खामगाव.

Web Title: LotaBahadder collects fine of 16 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.