घराला आग लागून लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: May 7, 2015 01:11 IST2015-05-07T01:11:44+5:302015-05-07T01:11:44+5:30
संग्रामपूर तालुक्यातील घटना.

घराला आग लागून लाखोंचे नुकसान
संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील आदिवासीबहुल दयालनगर येथील एका घराला ५ मे रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास आग लागून घरातील जीवनावश्यक साहित्य खाक झाल्याने संसार उघड्यावर आला. या घटनेत १ लाख २0 हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दयालनगर या आदिवासी गावातील देवसिंह नाथुसिंह कनाशा यांचे शिवणी शिवारा तील शेतातील घराला ५ मे रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत घरात साठवून ठेवलेले १५ पोते मका, २0 पोते गहू , १0 हजारांची रोकड, कपडे, भांडी असे जीवनावश्यक साहित्य घरासह जळून खाक झाले. यामध्ये एकूण १ लाख २0 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी कनाशा कुटुंबातील वृद्धा मळीबाई ही घराबाहेर झोपलेली होती, तर इतर कुटुंबीय ना तेवाइकाच्या लग्नाला गेले होते.