खडकपूर्णा धरणाच्या उजव्या कालव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:42+5:302021-09-27T04:37:42+5:30

या धरणाच्या उजव्या कालव्याचे काम काही ठिकाणी राहिलेले असून, अशा काही ठिकाणी कालव्याच्या सतत आठ ते दहा ...

Loss of farmers due to right canal of Khadakpurna dam | खडकपूर्णा धरणाच्या उजव्या कालव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

खडकपूर्णा धरणाच्या उजव्या कालव्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

या धरणाच्या उजव्या कालव्याचे काम काही ठिकाणी राहिलेले असून, अशा काही ठिकाणी कालव्याच्या सतत आठ ते दहा दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या या उजव्या कालव्यामध्ये पाणी वाहत आहे. या कालव्यातून पाणी पाझरून राहेरी खु. येथील शेतकरी शांताबाई लिबांजी डोईफोडे गट नंबर ८७ क्षेत्र ३ एकर शेती असून, या शेतामध्ये सोयाबीन या पिकाची पेरणी केलेली आहे. याच शेतामधीन कालवा गेलेला असल्याने शांताबाई डोईफोडे यांच्या म्हणण्यानुसार (पाटातून ) कालव्यातून सतत सारखे पाणी पाझरून शेतामधील सोयाबीन पूर्णपणे पिवळी पडली आहे. हा प्रकार अपुरे काम राहिल्यामुळे नुकसान होत आहे. हे पाझरणारे पाणी लवकरात लवकर बंद केले नाही तर शांताबाई डोईफोडे आणि लिबांजी डोईफोडे हे उपोषणास बसरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

माझ्या शेतामधून उजवा कालवा गेलेला असून, सतत पावसामुळे या कालव्यामध्ये पाणी नेहमी साचल्याने या कालव्यातून पाणी पाझरून माझ्या शेतातील सोयाबीन हे पीक पूर्णपणे पिवळी व खराब झाले. तरी संबंधित खात्याकडून नुकसानभरपाई मिळण्यात यावी.

-लिंबाजी डोईफोडे,

शेतकरी, राहेरी खु.

Web Title: Loss of farmers due to right canal of Khadakpurna dam