ट्रॅव्हल्स कंपन्याकडून प्रवाशांची लूट
By Admin | Updated: October 25, 2014 23:54 IST2014-10-25T23:54:00+5:302014-10-25T23:54:00+5:30
ट्रॅव्हल्स मालकांनी मनमानी, भाडेवाढ दुप्पट.

ट्रॅव्हल्स कंपन्याकडून प्रवाशांची लूट
बुलडाणा : दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे, नाशिक येथे जाणार्या व तेथून परत येणार्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ट्रॅव्हल्स मालकांनी मनमानी करीत तब्बल दुप्पट भाडेवाढ केली आहे. दरवर्षी या ट्रॅव्हल्स मालकांच्या दिवाळीत मात्र प्रवाशांचे दिवाळे निघत असताना उपप्रादेशिक परिवहन विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. सध्या दिवाळीचा माहोल आहे, प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू आहे. बुलडाणा-पुणे या मार्गावर स्लिपर कोचमधील प्रवासासाठी एक हजार ते १२00 रुपये प्रती सिट भाडे आकारले जात आहे. तर सिटिंगसाठी ७५0 ते ८00 रुपये आकारले जात आहेत. बुलडाणा-मुंबई या मार्गावर सध्या एसी स्लिपरसाठी १२00 रुपये भाडे आकारण्यात येत आहे. तर नियमित सिझनमध्ये हे भाडे ४५0 ते ५00 रुपये एवढे आकारल्या जाते. परिवहन विभागाचे नियम धाब्यावर बसवून ट्रॅव्हल्स मालक आपली मनमानी करतात. याकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे साफ दुर्लक्ष होत आहे. लक्झरी मालक प्रवाशाला कशी सेवा पुरवितो आणि प्रवासी वाहतुकीतील अंतर्गत स्पर्धा या सार्यावर भाडे दरात वाढ किंवा घट ठरलेली असते. दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे, नाशिक येथे जाणार्या व तेथून परत येणार्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ट्रॅव्हल्स मालकांनी मनमानी करीत दुप्पट भाडेवाढ केली आहे. ट्रॅव्हल्स मालकांच्या दिवाळीत मात्र प्रवाशांचे दिवाळे निघाले आहे. पुणे व मुंबई या दोन मार्गावरील दिवाळीच्या काळातील गर्दी पाहता शहरातील सर्वच ट्रॅव्हल्स मालकांनी सध्या दुप्पट भाव केले आहेत