लोणार सरोवराची अंतराळ शास्त्रज्ञाकडून पाहणी
By Admin | Updated: October 15, 2014 00:25 IST2014-10-14T23:23:30+5:302014-10-15T00:25:55+5:30
लोणार सरोवराबद्दल भारतियांमध्ये उदासिनता, इस्त्रोचे माजी अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश डोळस यांची खंत.

लोणार सरोवराची अंतराळ शास्त्रज्ञाकडून पाहणी
लोणार (बुलडाणा) : महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान मंडळाचे सल्लागार व भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे माजी अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश डोळस यांनी लोणार सरोवराची पाहणी केली.
लोणार सरोवराची निर्मिती, येथील जैव विविधता, तसेच येथे चालणार्या संशोधनांची माहि ती डॉ.प्रकाश डोळस जाणून घेतली. यावेळी प्रा. डॉ. सुनिल दाभाडकर आणि डॉ.संतोष बनमेरु यांनी डॉ. प्रकाश डोळस यांना माहिती दिली. तत्पूर्वी, स्थानिक कै.कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालयात डॉ. डोळस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले हो ते. लोणार सरोवर ही एक खुली प्रयोगशाळा असून, विज्ञानाच्या विविध शाखांचे संशोधन येथे करता येईल. लोणार सरोवराबद्दल भारतियांमध्ये उदासिनता असून, महाराष्ट्रातील लोकांनाही लोणार सरोवराची फारशी माहिती नसल्याची खंत डॉ. डोळस यांनी व्या ख्यानादरम्यान व्यक्त केली. अंकशास्त्र, अंतराळ शास्त्र, भौतिक शास्त्र आणि त्यावर आधारि त संशोधन अशा विविध विषयांवर त्यांनी व्याख्यान दिले. इस्त्रोच्या मंगळ मोहिमेतील लोणार सरोवराच्या अभ्यासाची पार्श्वभूमी, अंतराळातील जीवसृष्टीची शक्यता, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या समवेतचा अनुभव आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ.डोळस यांनी चर्चा केली. महाभारतासह पुराणातील घटना आणि त्यामागील वैज्ञानीक दुवे, यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.