लोणार सरोवराला भरीव निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:37 IST2021-02-09T04:37:38+5:302021-02-09T04:37:38+5:30

लाेणार : खासदार व आमदारांच्या प्रयत्नामुळे लोणार सरोवराला भरीव निधी मिळणार, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी ...

Lonar Sarovar will get huge funds | लोणार सरोवराला भरीव निधी मिळणार

लोणार सरोवराला भरीव निधी मिळणार

लाेणार : खासदार व आमदारांच्या प्रयत्नामुळे लोणार सरोवराला भरीव निधी मिळणार, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी रोजीच्या लोणार सरोवर संवर्धन व विकास आराखडा संदर्भातील बैठकीत सन २०२१ - २२ करिता दिलेले विभागनिहाय कामांचे उद्दिष्ट व त्याचे नियोजन संदर्भात माहिती देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांनी ८ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे उपस्थित होते. दरम्यान पत्रकार परिषद मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांनी सांगितले कि लोकसभेमध्ये खा. प्रतापराव जाधव यांनी तर विधानसभामध्ये आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी वेळोवेळी सरोवर विकासासंदर्भात मागणी लावून धरल्याने लोणार सरोवर विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लोणार सरोवरावर विशेष लक्ष आहे. यामुळे त्यांनी लोणार सरोवराला भेट देत पाहणी केली. यामुळे येत्या काळात लोणार सरोवर विकासकामे होऊन पर्यटनाला चालना मिळेल,असेही ते म्हणाले.

Web Title: Lonar Sarovar will get huge funds