शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लोणार: तालुक्यातील धरणांमधील जलसाठय़ात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:25 IST

लोणार: तालुक्यातील अंभोरा व हिरडव येथील धरणांमधील जलसाठा शून्यावर पोहचला आहे, तर इतर धरणांतील जलसाठाही खालावला आहे. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याने पाणी पुरवठय़ासाठी टँकरची मागणी वाढत आहे. 

ठळक मुद्देलोणार तालुक्यात टँकरची वाढली मागणी दोन धरणातील जलसाठा शून्यावर!

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यातील अंभोरा व हिरडव येथील धरणांमधील जलसाठा शून्यावर पोहचला आहे, तर इतर धरणांतील जलसाठाही खालावला आहे. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याने पाणी पुरवठय़ासाठी टँकरची मागणी वाढत आहे. गेल्या पाच वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण कमी होत चालल्याने तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी अल्प स्वरूपाचा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्नावरही झाला. तालुक्याला भीषण पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी विहिरी अधिग्रहण व टँकरची सुविधा करून पाणीपुरवठा मागील वर्षांपासून उन्हाळ्यात होत आहे; मात्र जलस्वराज, महाजल सारख्या ग्रामीण पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीच राबविल्याने  पाणीटंचाईची परिस्थिती दरवर्षी दिसून येते. ठोस उपाययोजना न राबविल्यामुळे आणि जलसंधारण ची कामे थातूरमातूर होत असल्याने तालुक्यातील जनतेला यावर्षीही भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावातील नागरिक खासगी  टँकरने  पाणी विकत घेत असून, त्यासाठी किमान ५00 रुपये मोजत आहेत; मात्र ज्यांची पाणी विकत पाणी घेण्याची कुवत नाही त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात भटकंती करावी लागत आहे.

लाखो रुपये खर्च करूनही पाणीटंचाई कायम!उन्हाळा आला की तालुक्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. सदर पाणीटंचाई निवारण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी विविध योजनेद्वारे लाखो रुपये खर्च करण्यात येतो; मात्र अर्धवट कामे व अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करूनही संबंधित गावात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत आहे.  

विहीर अधिग्रहण केलेली गावे!लोणार तालुक्यात वझर आघाव, हिवराखंड, चिंचोली सांगळे, शारा, येसापूर, रायगाव, तांबोळा, दाभा, देवानगर, वडगाव तेजन, ब्राह्मण चिकना, पहूर, वाल्हूर, वेणी, शिंदी, वसंत नगर, सोमठाना, उदनापूर, कोयाळी या गावांमध्ये प्रत्येकी एक तसेच सावरगाव तेली चार, भुमराळा चार, अंजनी खुर्द दोन, किनगाव जट्ट दोन, भानापूर दोन विहिरी अधिग्रहण केल्या आहेत.  

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरDamधरणWaterपाणी