लोणार सरोवरातील पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड दुर्लक्षीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:13 IST2018-09-01T15:13:01+5:302018-09-01T15:13:56+5:30
लोणार : पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत, असून रामगया व कुमारेश्वर मंदिर परिसराततील पुरातन बांधकामात आढळणाऱ्या तथा पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड आता फारसे दिसत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

लोणार सरोवरातील पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड दुर्लक्षीत
- किशोर मापारी
लोणार : पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत, असून रामगया व कुमारेश्वर मंदिर परिसराततील पुरातन बांधकामात आढळणाऱ्या तथा पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड आता फारसे दिसत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
लोणार सरोवराला २००२ मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. मात्र त्याचा सांभाळ करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या वन विभाग व पुरातत्व विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. जतन आणि संवर्धनावर होणारा खर्च पाहता येथे प्रभावी कामे होणे अपेक्षीत आहे. सरोवर परिसरात असलेल्या मंदिराजवळ पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, दगड आणि कोरीवकाम असलेले शिल्प, खांब असा अनमोल ठेवा आज ºहास पावत आहेत. रामगयेचे पाणी आटल्यामुळे या भागत पूर्वी दिसणारे हे दगड आता येथे फारसे दिसत नाही. सरोवर पाहण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांनी हे दगड व विटा उत्सूकतेपोटी पाहून इतरत्र टाकल्याने परिसरात पूर्वी दिसणारे असे दगड आज दुर्मिळ झाले आहेत.