लोणार येथे वीज पडून दोन जखमी

By Admin | Updated: June 25, 2016 00:54 IST2016-06-25T00:54:03+5:302016-06-25T00:54:03+5:30

शेतात काम करीत असताना पडली वीज.

Lonar and two others injured in the accident | लोणार येथे वीज पडून दोन जखमी

लोणार येथे वीज पडून दोन जखमी

लोणार (जि. बुलडाणा): शेतात पेरणी करण्याकरिता गेलेल्या दोघांनी पाऊस सुरु झाल्यामुळे शेतातील निंबाच्या झाडाचा आसरा घेतला. दरम्यान, निंबाच्या झाडावर वीज पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना वाल्हूर शिवारात ३ वाजतादरम्यान घडली. दोघांवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील अंजनी खुर्द येथील मधुकर अप्पा नाथाप्पा काटकर (वय ६0) आणि शे.इस्माईल शे.लालमियाँ हे दोघेही आपल्या वाल्हूर शिवारातील शेतात खरिपाच्या पेरणीसाठी गेले होते. ३ वाजतादरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे या दोघांनीही पेरणी थांबवून शेतातील निंबाच्या झाडाचा आडोसा घेतला; परंतु त्याच झाडावर वीज पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. पावसानंतरही शेतात पेरणीसाठी गेलेले वडील घरी परत आले नसल्याने त्यांना आणण्यासाठी शेतात गेल्यावर वडील आणि इस्माईलभाई झाडाखाली पडलेले असल्याचे पाहून मधुकर काटकर यांच्या मुलाने पुंजाजी काळे, अमोल गायकवाड आणि अनिल काटकर यांनी भरपावसात दोघांनाही खांद्यावर उचलून गावापर्यंत आणले आणि उपचाराकरिता मेहकर गाठले. दोघांनाही वेळेवर दवाखान्यात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचवता आले.

Web Title: Lonar and two others injured in the accident