बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By Admin | Updated: August 3, 2014 23:58 IST2014-08-03T23:58:04+5:302014-08-03T23:58:04+5:30

समतेचे निळ वादळ या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

Lodged in front of Buldana District Collectorate | बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

बुलडाणा: वरुड येथील बौध्द बांधवावर अमानुष अत्याचा करणार्‍या सरपंच व पोलिस अधिकार्‍या विरुध्द तातडीन कारवाई करावी या मागणीसाठी समतेचे निळ वादळ या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
वरुड बु. येथील सरपंच पती प्रकाश गव्हाड यांनी पोलिसांच्या संगनमताने बौध्द बांधवावर अमानुष मारहाण केली. आंबेडकर चौकातील ३५ वर्षा पूर्वीचा धम्मध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र जेसीबीच्या सहायाने काढून विटंबना केली.शांततेच्या मार्गाने मागण्या मागणार्‍या बौध्द बांधवावर तसेच महिलावर अश्रुधूराचे नळकांडे फोडून, पाण्याचे फवारे मारून पोलिसांनी अत्याचार केला. तसेच धम्मगुरूवर ३0७ सारखे गुन्हे दाखल केले.तेव्हा सरपंच पती प्रकाश गव्हाड व त्यांचे भाडोत्री गुंड आणि ठाणेदार शेळके यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाई अशांत वानखेडे यांनी केली. यावेळी लालाजी इंगळे, तुळशिराम वाघ, प्रकाश पचरवाल, अलका ताई झनके, शांताराम इंगळे, सिद्धार्थ पैठणे, प्रा.शशिकांत जाधव, दिलीप इंगळे यांचेही भाषणे झाले.

Web Title: Lodged in front of Buldana District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.