विश्वी येथील शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: June 28, 2014 01:42 IST2014-06-28T01:22:09+5:302014-06-28T01:42:36+5:30
मेहकर तालुक्यातील मौजे विश्वी येथील घटना

विश्वी येथील शाळेला ठोकले कुलूप
मेहकर : तालुक्यातील मौजे विश्वी येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेची जमिन हर्रासी मोबदला परत न मिळाल्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ जून रोजी ग्रामस्थांनी शाळेला ताला ठाकून शाळा बंद आंदोलन केले.
विश्वी येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या सकस आहार योजनेअंतर्गत शासनाकडून शाळेला जमिन हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. काही वर्षा पर्यंत जमिनीच्या हर्रासीमधून मिळणारी रक्कम ही जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेला विशिष्ट कामे करण्यासाठी परत मिळाली होती. परंतु सन २00५ पासून हर्रासी झालेली रक्कम जिल्हा परिषद शेष फंडात जमा केल्या जाते. त्यामुळे गावाला त्याचा कोणताही फायदा होत नाही. गावातील जमिनीच्या हर्रासीच्या पैशावर गावातील शाळेचाच अधिकार आहे. त्यामुळे सन २00५ ते २0१४ या वर्षापर्यंत जि.प.कडे ३ लाख ६३ हजार १0७ रुपये घेणे बाकी आहे. शाळेला तात्काळ सदर रक्कम परत करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद आंदोलन केले.