शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

बुलडाणा जिल्ह्यात २३ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम, जुने नियंम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 11:06 IST

Lockdown in Buldana district till March 23 जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता, २३ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता, २३ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघड्या ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. १६ मार्च ते २८ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असून, सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.या आदेशान्वये जिल्ह्यात सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. दूधविक्रेते, दूध वितरण केंद्र सकाळी ६ ते दुपारी ३ व सायंकाळी ६ ते रात्री ९:३० वाजेपर्यंत सुरू राहतील. जिल्ह्यात सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्योग सुरू राहतील. शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून ५० टक्के संख्या ग्राह्य धरून ही कार्यालये सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्सही ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. त्यानंतर, सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत पार्सल सुविधा देण्याची परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता ५० व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी आवश्यक राहील. लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये बँड पथकातील सदस्यांचाही समावेश राहील. अंत्यविधीकरिता २० व्यक्तींना परवानगी असेल. शैक्षणिक संस्थामध्ये संशोधन कर्मचारी, अशैक्षणिक कर्मचारी, वैज्ञानिक यांना उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ही कामे करण्यास परवानगी राहील.

राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना बंदीजिल्ह्यातील सर्व सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहणार आहेत, तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील, तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणी १० व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, खासगी शिकवणी केंद्र बंद राहतील. मात्र, ऑनलाइन शिक्षणास परवानगी राहील. वैद्यकीय सेवा वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रुग्णालय बंदचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. रुग्णवाहिकांचीही सेवा २४ तास उपलब्ध राहतील.

मालवाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहणारमालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील. आंतर जिल्हा बस वाहतुकीस एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसह शारीरिक अंतर व निर्जंतुकीकरण करून प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी राहणार आहे. चारचाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशी, तीनचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवाशी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क लावून दोन व्यक्तींना परवानगी असेल. 

पूर्वनियोजित परीक्षा वेळापत्रकानुसारचया कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा त्यांच्या वेळापत्रकानुसार होतील. परीक्षार्थींना परीक्षेचे अेाळखपत्र व पालकांना त्यांचे अेाळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. आगामी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या केवळ ५० टक्के क्षमतेने शारीरिक अंतर, मास्क व निर्जंतुकीकरण नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील.

टॅग्स :buldhanaबुलडाणा