मतमोजणी केंद्राचे स्थळ बदलले

By Admin | Updated: September 19, 2014 23:11 IST2014-09-19T23:11:38+5:302014-09-19T23:11:38+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ईलेक्ट्रानिक व्होटींग मशिन्सची व्यवस्था सामाजिक न्याय भवनात.

The location of the counting center changed | मतमोजणी केंद्राचे स्थळ बदलले

मतमोजणी केंद्राचे स्थळ बदलले

बुलडाणा : येत्या १५ आक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर १९ आक्टोबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल घोषीत होणार आहेत. १५ ते १९ हे पाच दिवस ईलेक्ट्रानिक व्होटींग मशिन्स स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. व त्याच ठिकाणी मतमोजणी होईल. दरवेळी ईलेक्ट्रानिक व्होटींग मशिन्स मलकापूर रोडवरील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या ईमारतीमधील स्ट्राँग रूम मध्ये ठेवल्या जातात. यावेळी ह्या मशिनची जागा बदलली असून चिखली रोडवरील सामाजिक न्याय भवनाच्या हॉलमध्ये ईव्हीएम मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे.
येथील हॉलमध्ये स्ट्राँगरूम तयार करून कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम मशिन ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी या संपूर्ण परिसराची प्रशासनाने पाहणी करून हा परिसर तसेच ईमारतीचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजूरात मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना व स्टाँगरूम तयार करण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. यावेळी निवडणूकीच्या मतमोजणीचे स्थळ प्रथमच बदलविण्यात आले आहे.

Web Title: The location of the counting center changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.