वाईन बारला आग लागून लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: July 5, 2014 23:44 IST2014-07-05T22:30:06+5:302014-07-05T23:44:34+5:30
अंबिका बार अँण्ड रेस्टॉरंटला आग लागून फर्निचर, काऊंटर, कॉम्प्युटर, फ्रिजर व मद्यसाठा पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना ४ जुलैच्या मध्यरात्री घडली.

वाईन बारला आग लागून लाखोंचे नुकसान
चिखली : येथील जाफ्राबाद रोडवरील आमराई परिसरात असलेल्या अंबिका बार अँण्ड रेस्टॉरंटला आग लागून फर्निचर, काऊंटर, कॉम्प्युटर, फ्रिजर व मद्यसाठा पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना ४ जुलैच्या मध्यरात्री घडली. अचानकपणे लागलेल्या या आगीत सुमारे २0 ते २२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
येथील जाफ्राबाद रोडवरील आमराई परिसरात सुनिल भगवान सोळंकी यांचे अंबिका बार अँण्ड रेस्टॉरंट आहे. ४ जुलैच्या मध्यरात्री या बारला अचानकपणे लाग लागल्याची माहिती मिळताच सुनिल सोळंकी यांनी बारकडे धाव घेतली.
यावेळी अग्नीशामन दलाला पाचारण करण्यात आले व आग विझविण्याचा प्रयत्न केल्या गेला मात्र तोपर्यंत बारमधील मद्यसाठा, डीप फ्रीजर, कॉम्प्युटर, सी.सी. टी.व्ही.यंत्रणा, फर्निचर असे सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे सोळंकी यांचे सुमारे २0 ते २२ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे सोळंकी यांनी म्हटले आहे. याबाबत ५ जुलै रोजी चिखली पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले आहे.