दुस-या दिवशीही तुरळक पाऊस
By Admin | Updated: May 11, 2015 02:10 IST2015-05-11T02:10:14+5:302015-05-11T02:10:14+5:30
दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस.

दुस-या दिवशीही तुरळक पाऊस
बुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शनिवारी दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वार्याला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. रविवारी पुन्हा सायंकाळी बुलडाणा परिसरात जोरदार वादळी वार्यासह काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे एकच तारांबळ उडाली.