वळण रस्त्यावर गतिरोधक उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:33+5:302021-09-12T04:39:33+5:30
भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांवर या लोकांना कोणत्याही प्रकारच्या आजपर्यंत वेगावर नियंत्रण ठेवण्याची सूचना नाही. ...

वळण रस्त्यावर गतिरोधक उभारा
भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांवर या लोकांना कोणत्याही प्रकारच्या आजपर्यंत वेगावर नियंत्रण ठेवण्याची सूचना नाही. त्याचप्रमाणे मुंबई-नागपूर महामार्गावर असलेल्या खडकपूर्णा नदीवरील क्षतीग्रस्त झालेला पूल त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली असून, एसटी महामंडळाच्या संपूर्ण बस दुसरबीड ते देऊळगाव मही, देऊळगाव राजा या मार्गे जालना, औरंगाबाद धावत असतात. या रस्त्यावर तढेगावपर्यंत दोन-तीन वळण रस्त्याला असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडी असल्यामुळे समोरून येणारे वाहन हे दिसत नाही. वेगात आलेले वाहन समोरच्या वाहनाला धडकते. अचानक समोरून वाहन दिसल्यामुळे रोडच्याखाली उलटतात. मागील अपघातामध्ये १३ मजुरांना जीव गमवावा लागला होता. तेव्हा तढेगाव, दुसरबीड येथील नागरिकांकडून गतिरोधकाची मागणी होत आहे, अन्यथा रोडवर बसून या वाहनांना रोखण्याकरिता आंदोलन करावे लागेल असे तढेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश कुटे, शरद दराडे, धनंजय घुगे, सुभाष घुगे, बळीराम दराडे यांनी सांगितले.