गौण खनिज वाहतुकीसाठी परवाना बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:05 PM2021-01-13T12:05:18+5:302021-01-13T12:05:33+5:30

Khamgaon News वाहतूक परवाने वापरणे बंधनकारक करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले. 

License binding for secondary mineral transportation | गौण खनिज वाहतुकीसाठी परवाना बंधनकारक

गौण खनिज वाहतुकीसाठी परवाना बंधनकारक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव  : जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत देण्यात येणाऱ्या गौण खनिज तात्पुरता उत्खनन परवानगीनुसार दगड, माती, मुरुम वाहतुकीसाठी, यापुढे वाहतूक परवाने वापरणे बंधनकारक करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले. 
महसूल व वनविभागाच्या १२ नोव्हेंबर, २०२० अन्वये गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक परवाना देण्याबाबत जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रारूप वापरले जाते. त्यामुळे वाहतूक परवान्याबाबत एकसंधता दिसून येत नाही. ज्यामुळे खोटे वाहतूक पास बनवून वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व थांबवून राज्यातील वाहतूक परवान्यामध्ये एकसूत्रता येण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी वाहतूक परवान्याचे प्रारूप निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील मंजूर सर्व खाण पट्टाधारकांना दगड, खडी वाहतुकीसाठी परवान्यासह वाहतूक करणे बंधनकारक केले आहे.  वरील वाहतूक परवाना नसल्यास ही वाहतूक अवैध समजण्यात येऊन या वाहनावर  कारवाई करण्यात येईल, 

Web Title: License binding for secondary mineral transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.