बिबट मृत्यू प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक
By Admin | Updated: August 3, 2016 00:17 IST2016-08-03T00:17:54+5:302016-08-03T00:17:54+5:30
कोठडीअभावी बिबट मृत्यू प्रकरणातील तिन्ही आरोपी वन अधिका-यांच्याच नजरेसमोर.

बिबट मृत्यू प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक
बुलडाणा: तालुक्यातील गुम्मी राऊंडमधील तेलीखोरे जंगलात दोन मादी बिबट्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत वन विभागाला आढळला. याप्रकरणी वन विभागाने जामठी येथील साहेबराव शंकर थोरात (५६) व रमेश रामा रावळकर (४३) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांना चार दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली, तर वन विभागाच्या अधिकार्यांनी शोध मोहीम राबवून २ ऑगस्ट रोजी सकाळी जामठी येथील दीपक गजेबा सावळकर (२७) या आरोपीला अटक केली. बिबट मृत्यू प्रकरणातील तिन्ही आरोपी कोठडीअभावी वन अधिकार्यांच्याच नजरेसमोर ठेवण्यात आली आहेत.