Legislative Council elections; Polling will be held at 14 centers | विधान परिषद निवडणूक;   १४ केंद्रांवर होणार मतदान

विधान परिषद निवडणूक;   १४ केंद्रांवर होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शिक्षक विधान परीषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १४ मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात मतदान घेण्यात येणार आहे.
अमरावती विभागातील शिक्षक विधान परीषद मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ज्या तालुक्यात एक हजारापेक्षा कमी मतदार आहेत. त्या ठिकाणी एकच मतदान केंद्र राहणार आहे. मतदानावर कोरोनाचे सावट आहे. प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात येणार असून, सॅनीटायझर व मास्कचा वापर करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास साथरोग नियंत्रण कायदा - १८९७,  आपत्ती व्यवस्थापण कायदा - २०१५, भारतीय दंड संहिता -कलम १८८ व प्रचलित फौजदारी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. मतपत्रिका गुलाबी रंगाची राहणार आहे. मतदारांना मतदान करण्याकरिता जांभळ्या शाईचाच पेन वापरावा लागणार आहे. अन्य कोणत्याही शाईचा पेन वापरता येणार नाही. मतदारांना मतपत्रिकेवर असलेल्या २७ उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मतदान करता येणार आहे. पसंतीक्रमांक हे इंग्रजीतच टाकावे लागणार असून, रोमन किंवा मराठीत भाषेत लिहीता येणार नाही. मतदापत्रिकेतवर स्वाक्षरी, आद्याक्षरे किंवा कशाचीही खून करू नये तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.


कोरोना संदिग्धांचे मतदान ४ ते ५ वाजता 
मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे तापमान व आॅक्सीजन लेव्हल तपासण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे तामपान जास्त किंवा  आॅक्सीजन लेव्हल कमी आहे. अशा मतदारांना थांबवून ठेवण्यात येणार असून, ४ ते ५ वाजताच्या दरम्यान मतदान करू देण्यात येणार आहे. 

Web Title: Legislative Council elections; Polling will be held at 14 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.